मंदसोर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा

मंदसोर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील मंदसोर इथे 8 वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने दोघाजणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भैय्यू (20 वर्षे) आणि आसिफ (24 वर्षे) अशी या आरोपींची नावे आहेत.

या दोघांनाही नव्याने लागू करण्यात आलेल्या बाल लैंगिक गुन्हेगारी विरोधी कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले असल्याचे सरकारी वकील बी.एस. ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणातील पीडीत बालिकेचे 26 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. मंदसोर इथे शाळेच्या बाहेर आपल्या वडिलांची वाट बघत असताना तिला या दोघांनी पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या आरोपींनी या बालिकेचा गळा चिरून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता. तिला मान, चेहरा, डोके आणि जननेंद्रियांना गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारांसाठी इंदौरला हलवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)