मंदसोर बलात्कार प्रकरणावरून भाजप खासदाराने केले राजकारण

मंदसोर : मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचीही पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या घटनेवर भाजपा आमदाराने खालच्या पातळीवरच्या राजकारणाचा नमुना समोर ठेवला आहे.

शुक्रवारी जेव्हा मंदसोरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर अत्यंत घृणास्पदरीत्या बलात्कार झाला. त्या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला. त्याच दरम्यान भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांच्याबरोबर आमदार सुदर्शन गुप्ताही पीडित चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदुरच्या एमवाय रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पीडितेचे कुटुंबही उपस्थित होते. खासदारांनी डॉक्टरांकडे मुलीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याच वेळी आमदार सुदर्शन पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाले, खासदारसाहेबांना धन्यवाद बोला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.  बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्यानं राजकीय वर्तुळातून यावर टीकेची झोड उठली आहे. सुदर्शन गुप्ता पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाला, मंदसोर खासदारमहोदयांना धन्यवाद करा, कारण ते तुमच्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात आले आहेत. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनीही खासदारसाहेबांसमोर हात जोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)