‘मंत्र’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित  

‘विसरा चिंता जगाची, Enjoy करा क्षणभर टेन्शनला करा टाटा’… या टॅग लाइनने ‘मंत्र’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. नुकताच या सिनेमाचा म्युझिक आणि टीझर लॉन्च सोहळा उत्साहात पार पडला. 

लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’च्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे. या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

या चित्रपटात अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पुरोहिताच्या भूमिकेत दिसणार आहे तर ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे ही एका वेगळ्याच भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे आणि सुजय जाधव सारखे तरुण आणि नवे चेहरेही यात पहायला मिळतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)