मंत्र्यांसोबत सलमानची सायकलिंग 

बॉलिवूड भाईजान सलमान खान सध्या आपल्या आगामी “भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भाईजान चर्चेत असतो. त्याचा नुकताच केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबत सायकलिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>People of Arunachal Pradesh will be forever indebted to <a href=”https://twitter.com/BeingSalmanKhan?ref_src=twsrc%5Etfw”>@BeingSalmanKhan</a> for promoting the State as a destination for adventure tourism. People showered him all the love &amp; affection at Menchuka today. <a href=”https://t.co/L9W8SIMLMb”>pic.twitter.com/L9W8SIMLMb</a></p>&mdash; Kiren Rijiju (@KirenRijiju) <a href=”https://twitter.com/KirenRijiju/status/1065566144340389891?ref_src=twsrc%5Etfw”>November 22, 2018</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील मेचुका या डोंगराळ भागात सायकलिंग करतानाचा आहे. सलमान, रिजीजू आणि पेमा खांडू यांच्याशिवाय आणखीही व्यक्ती त्यांच्यासोबत यात सायकलिंग करत असल्याचे दिसत आहे. सायकलिंग करत असलेले रस्ते पाहता हा अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भाग असल्याचे लक्षात येत आहे. या खास व्हिडिओला सलमानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

दरम्यान, पंजाब येथे चित्रपटाच्या शुटिंगमुळे येथील शेतक-यांनाही मोठा आर्थिक फायदा झाला असून हे शेतकरी लखपती झाले आहेत. लुधियाना येथे चित्रपटातील वाघा बॉर्डरचा सेट उभारण्यासाठी येथील चार शेतक-यांची 19 एकर जमीन भाड्याने घेण्यात आली होती. या शेतक-यांना प्रती एकर 80 हजार रुपये भाडे देण्यात आले. यातून चार शेतक-यांना तब्बल 15 लाख 20 हजार रुपयांचा लाभ झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
5 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)