मंत्र्यांनो ! शब्दांचा खेळ करणे थांबवा ; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई: जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही, असे विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. मात्र त्या आज मंत्रालयात हजर होत्या त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ? 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी जाहीर केला. नांदेडच्या मळेगाव इथे सुरू असलेल्या खंडोबाच्या यात्रेला पंकजा मुंडे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी पार पडलेल्या धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा यांनी हे विधान केलं होत.

धनंजय मुंडेंनी लगावला टोला 

‘मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’, ‘मंत्रालयाची पायरी चढणार नाही’… मंत्र्यांनो ! शब्दांचा खेळ करणे थांबवा. आरक्षण कधी देणार ते बोला. नाहीतर आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून ही जनताच तुम्हाला अडवेल.

राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून देखील पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. “भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये किती गांभीर्य असते हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतरच्या त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २४ तासही आपण केलेली घोषणा पाळता न येणारे या सरकारमधील मंत्री लोकांची दिशाभूल करण्यात पटाईतच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)