मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींचे तपशील देण्यास “पीएमओ’चा नकार 

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधातील तक्रारींची ही माहिती व्यक्तिगत आणि त्रासदायक ठरू शकते, असे “पीएमओ’ने म्हटले आहे. देशातील प्रमुख तपास संस्था असलेल्या “सीबीआय’च्याच पदाधिकाऱ्याने केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याच पार्श्‍वभुमीवर “पीएमओ’ने माहितीच्या अर्जाद्वारे मागवलेली ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाकडे वेळोवेळी अशा तक्रारी येतच असतात. यामध्ये नावासह आणि निनावी तक्रारींचाही समावेश असतो. या तक्रारींद्वारे केल्या गेल्या आरोपांची सत्यता तपासली जाते. त्यासाठी संबंधित कागदपत्रेही तपासली जातात, असे “पीएमओ’ने या अर्जाच्या उत्तरात म्हटले आहे. व्हिसलब्लोअर प्रशासकीय अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अर्जाद्वारे ही माहिती मागवली होती.

-Ads-

केंद्रीय मंत्र्यांबाबतची माहिती एकाठिकाणी ठेवलेले नसतात. विविध विभाग आणि खात्यांमध्ये या तक्रारींचे विभागवार नोंदी केल्या असतात, त्यामुळे ही मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची एकत्रित माहिती देणे शक्‍य नसल्याचे “पीएमओ’ने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)