मंत्र्यांच्या कमिटीकडून बैठकीचा बनाव 

सोलापूर विद्यापीठ नामांतर : माहितीच्या अधिकारात झाले उघड

सोलापूर – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याला विरोध असताना मंत्र्यांच्या कमिटीचा फार्स राज्य सरकारने केला. मात्र या कमिटीतील मंत्रीच बैठकीला गैरहजर असताना नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला गेला, असा आरोप करत याचिकाकर्त्यांने कमिटीच्या कामकाजावर आक्षेप घेणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राज्य सरकारने कमिटी स्थापन करून सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नामांतराचा निर्णय घेतला जाईल, अशी हमी उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र कमिटीने बैठकीचा बनाव करून मंत्र्यांच्या गैहजेरीत नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला, हे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याला विरोध असताना राज्य सरकार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नामांतराचा घाट घातल्याने शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर घोंड यांच्यावतीने ऍड. सतिश तळेकर आणि शैलेश जकापूरकर यांच्या वतीने सुधीर हल्ली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहे. राज्य सरकारने नामांतराच्या प्रश्नावर मंत्रिगट उपसमिती स्थापन करून सर्व संबंधित राजकीय, सामाजिक संघटना आणि अन्य घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही न्यायालयात दिली होती. परंतु अशी बैठकच झाली नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट उपसमितीची मंत्रालयात 15 मे आणि 19 मे रोजी बैठक झाली, असा राज्य सरकारचा दावा आहे. मात्र, त्या दिवशी महादेव जानकर, गिरीष बापट आणि राम शिंदे हे मंत्री राज्यातील विविध ठिकाणी दौऱ्यावर होते, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. या बैठकीचा इतिवृत्तांत तसेच इतर अहवालही बनावट तयार केल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच सदर बैठकीला एकही सामाजिक संघटना नसल्याने ही बैठकच झालीच नाही. केवळ बैठकीचा बनाव केला आहे, असा आरोपही याचिककर्त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)