मंत्रोपचार प्रकरणाचा अहवाल उपसंचालकांकडे सादर

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या मांत्रिक व डॉक्‍टरांच्या मंत्रोपचार प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाला अंतिम अहवाल पाठवला आहे. यामध्ये संध्या सोनवणे यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर, दीनानाथमधील नर्स यांचे जबाब तसेच उपचारांची कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत. हा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर खासगी डॉक्‍टरने परस्पर मांत्रिकाद्वारे फुले व इतर वस्तू डोक्‍यापासून पायापर्यंत सहा वेळा उतरून टाकल्या. हा व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला होता. दरम्यान महिलेचा 11 मार्च ला मृत्यू झाला. या विरोधात पोलिसात फौजदारी गुन्हाही दाखल झाला. दरम्यान या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून केली जाणारी तपासणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल उपसंचलाक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ.वैशाली जाधव यांनी दिली. या अहवालामध्ये कोणत्या शिफारशी केल्या आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. या अहवालात संध्या यांच्यावर उपचार करणारे डॉ. सतीश चव्हाण, डॉ. अनुराधा कुकडे, डॉ. शिवाजी विभूते आणि डॉ. धनराज गायकवाड यांचे लेखी जबाब घेण्यात आले आहेत. तसेच दीनानाथमधील मांत्रिकाचा व्हिडिओ काढताना तेथे उपस्थित असलेली नर्स आणि फार्मासिस्ट यांचाही जबाब घेण्यात आला असल्याचे कळते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)