मंत्री असल्याने इंधन दरवाढीची झळ नाही – आठवले

जयपूूर – मंत्री असल्याने इंधन दरवाढीची झळ बसत नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी दिली. त्यासाठी त्यांनी मंत्री म्हणून मिळणाऱ्या भत्त्यांचा संदर्भ दिला. येथे पत्रकारांनी इंधन दरवाढीचा वैयक्तिक पातळीवर फटका झाला का, असा प्रश्‍न विचारल्यावर आठवले यांनी त्यांच्या मिश्‍कील शैलीत उत्तर दिले.

मंत्रिपद गमावले तर झळ पोहचेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम सामान्य जनतेवर होत असल्याचे मान्य करावे लागेल. दर कमी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार गांभीर्याने काम करत आहे. राज्य सरकारांनी कर कमी केल्यास इंधन दर कमी होतील, असेही त्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)