मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे?

अजित पवार ः नोबल फार्मर्स्‌ 2019 या पीक प्रात्यक्षिक व पीक परिसंवाद समारोप

नारायणगाव, दि.7 (वार्ताहर) – मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे, शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घोषणा केली ते साडेचार वर्षे काय झोपले होते काय, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायणगाव येथे केली.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आयोजित नोबल फार्मर्स-2019 या पीक प्रात्यक्षिक व पीक परिसंवाद समारोप आणि तात्यासाहेब भुजबळ कृषी सन्मान वितरण समारंभ 2018-19 प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार शरद सोनवणे, युवा नेते अतुल बेनके, “विघ्नहर’चे चेअरमन सत्यशील शेरकर, बापूसाहेब भुजबळ, किशोर दांगट, पांडुरंग पवार, शरद लेंडे, देवदत्त निकम, विष्णु हिंगे, गुलाब पारखे, अंकुश आमले, महेश ढमाले, बाळासाहेब खिलारी, राजश्री बोरकर, तान्हाजी बेनके, विनायक तांबे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, रवींद्र पारगावकर, अरविंद मेहेर, डॉ.आनंद कुलकर्णी, सुरेश संचेती, नंदा डांगे, सोमजी पटेल, सुजित खैरे, एकनाथ शेटे, डॉ. संदीप डोळे, तान्हाजी वारूळे, शशिकांत वाजगे, रत्नदीप भरविरकर, रमेश जुन्नरकर, देविदास भुजबळ, ऋषीकेश मेहेर, प्रशांत शेटे, राहुल घाडगे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, केंद्र शासनाकडे कांदा निर्यातीचे धोरण नाही. 2900 दराने साखर विक्रीचे धोरण आहे; परंतु या दराने कुणीही टेंडर भरत नाही. कांद्याला 200 रुपये अनुदान दोतात या अनुदानात काय होणार आही, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रामुळे जुन्नर तालुक्‍याच्या विकासात भर पडली आहे. जिल्ह्यात एकच कृषी विज्ञान केंद्र असावे असा नियम असताना शरद पवार यांची विशेष मर्जी जुन्नर तालुक्‍यावर असल्याने कृषी विज्ञान केंद्राची मान्यता मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मेहेर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील ढवळे यांनी केले, तर रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.

  • सगळेच “फेल’ सरकार
    मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जीएसटी, नोटबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. मोदीची डिग्री फेल, चहाचा धंदा फेल, नोटबंदी फेल, चार्टर इंडिया फेल, सर्व काही फेल झाल्यानंतर आता राफेल, त्यामुळे जनता अच्छे दिन कब आयेगे हा विचार करीत नसून, ये दिन कब जायेगे असा विचार करीत आहे.
    – छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)