मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

मुंबई: सरकार दरबारी न्याय मागूनही न्याय मिळत नाही. हे सरकार गरीबांना न्याय देत नाही, हे सरकार काय कामाचे, असा आक्रोश करीत नवी मुंबईतील संतोष मोहिते याने आज मंत्रालयासमोर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात असल्याने विधान भवन आणि मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कडक बंदोबस्तातही संतोष मोहिते हा तरुण मंत्रालयाच्या गेटसमोर आला. त्याने रॉकेलने भरलेले कॅन स्वत:च्या अंगावर रिकामा करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईतील एका बिल्डरने मोहिते याला 18 लाखांना फसवले आहे. यासंदर्भात मंत्रालयात वारंवार खेटे मारूनही ना या बिल्डरवर कारवाई, ना कोणतीही नुकसानभरपाई. यामुळे कंटाळलेल्या मोहिते याने आत्महत्येचा निर्णय घेतला. मंत्रालयासमोर येऊन तो रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)