मंत्रालयात शिपायाला सक्तीची सेवा निवृत्तीची शिक्षा 

मुंबई: अवेळी कार्यालयात येणे, वरिष्ठांना न विचारता दांडी मारणे, परस्पर कार्यालयातून निघून जाणे आदी कारणांमुळे उद्योग विभागातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सक्तीची सेवा निवृत्तीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याविरोधात या कर्मचाऱ्याने आज मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्याला वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला.

दिलीप सोनावणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोनावणे याच्याविरोधात गेल्या वर्षभरापासून विभागीय चौकशी सुरु होती. चौकशीदरम्यान सोनावणे यालाही त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. परंतु चौकशीत तो दोषी आढळला. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सेवेतून निलंबित केल्यास त्याला कोणतेही सरकारी लाभ मिळणार नाही म्हणून त्याला निलंबित करण्याऐवजी सक्तीची सेवा निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या सोनावणे याने आज कुटुंबासह मंत्रालयात उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)