मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचे निधन

मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांना जे. जे.  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)