मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी नव्हे तर निर्मुलनासाठी विषारी गोळ्या टाकल्या

3 लाख 19 हजार 400 उंदरांची नव्हे तर गोळ्यांची संख्या
राज्य सरकारची सारवासारव

मुंबई – मंत्रालयात सात दिवसांत एका संस्थेने 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याचे सांगत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने चार दिवसानंतर आज सारवासारव केली. मंत्रालयातील प्रशासकीय दस्तावेज तसेच विद्युत तारांचे आणि इंटरनेटवर्कच्या केबल्स सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उंदिर निर्मूलनासाठी विषारी गोळ्या टाकण्यात आल्या. मात्र, 3 लाख 19 हजार 400 मेलेल्या उंदरांची संख्या नसून त्या गोळ्यांची संख्या आहे, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

विधानसभेत एका निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मंत्रालयात उंदिर निर्मूलनासाठी विषारी गोळ्या टाकण्याचे काम 1984 पासून सुरु आहे. मंत्रालय मुख्य इमारत, विस्तारित इमारत आणि मंत्रालय आवार या ठिकाणी मंत्रालयातील उंदरांमुळे नुकसान होऊ नये यासाठी विविध विभागांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 33 टक्के कामे ही मजूर संस्थांना दिली जातात. मंत्रालय मुख्य इमारत आणि मंत्रालयातील विस्तार इमारतीकरिता प्रत्येकी 2 लाख 40 हजार रकमेच्या दोन कामांना मंजूरी देण्यात आली, अशी माहिती पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)