मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुखयमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतले ताब्यात 

धुळे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या धुळे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीच्या दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर राष्टवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे “मुख्यमंत्र्यांचा धुळे दौऱ्यादरम्यान शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी व मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पाटील कुटुंबीयांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली दोंडाईचा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. फडणवीस सरकार त्यांना मदत तर करत नाही, पण त्यांच्यावर दडपशाही मात्र करतंय, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यानंतर पाटील यांनी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

https://twitter.com/NCPspeaks/status/1077886433103433728

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)