मंत्रालयातील उंदरे आवरेना, मग कालव्यातील कशी आवरणार

संग्रहित छायाचित्र

कळस येथे हर्षवर्धन पाटलांची सरकारव टीका

कळस- इंदापूर तालुक्‍यातील सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे खडकवासला धरणातील पाण्याचा प्रश्‍न आहे. काही दिवसांपूर्वी खडकवासला कालवा पुण्याजवळ फुटला त्यावर मंत्र्याने वक्‍तव्य केले की उंदीर व खेकड्यामुळे कालवा फुटला. या सरकारला मंत्रालयातील उंदरे आवरेना तर कालव्यातील कशी आवरणार? असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला लगावला.
कळस येथे एका कार्यक्रमानिमित्त हर्षवर्धन पाटील आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, इंदापूरला 1995 ते 2014 च्या कालखंडातील दुष्काळात पाणी आणले होते. दौंडला पाणी येते मग आपल्याला का नाही, इंदापूर तालुक्‍यातील 40 हजार एकर शेतीला व 28 गावांना पाणी मिळत नाही यास जबाबदार कोण हे तुम्हाला वेगळ सागंण्याची गरज नाही, यामुळे तालुका चारही बाजूने पिछाडीवर आहे अशा बोचऱ्या शब्दांत आमदार भरणे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा समाचार घेतला. तसेच शेतमालाला भाव नाही तरूणांना नोकरी नाही. कर्जमाफी फसली आहे असा आरोप त्यांनी सत्तारूढ सरकारवरही त्यांनी केला.

  • आमदार भरणेंचे नाव न घेता काढला चिमटा
    उजनीचे पाणी कर्नाटकात जाते मात्र, आपल्याला हक्काचे पाणी मिळत नसल्याने चार वर्षांत इंदापूर तालुक्‍याची भयानक परीस्थिती निर्माण झाली असल्याचे असे सांगून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)