मंडळांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा

उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते ः सासवड येथे बैठक
सासवड -येत्या काही दिवसांतच गणेशोत्सव येत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे प्रत्येक व्यक्‍तीला हक्‍क, स्वातंत्र्य आहे. मात्र, हे या माध्यमातून उत्सव साजरा करताना समाज बिघडविण्यापेक्षा समाज परिवर्तन कसे होईल याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने डिजे या वाद्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास अशा व्यक्‍तींवर कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच गणपती समोर अश्‍लीलता दाखविण्यापेक्षा समाज प्रबोधनात्मक उपक्रम आणि देखावे सादर करावेत. जेणेकरून समाजात तुमचा आदर्श निर्माण होईल, असे आवाहन भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांनी केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात तालुक्‍यातील गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भरते यांनी गणेश मंडळांना उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांचा पोलीस खात्यातर्फे सत्कार केला जाईल. तसेच अशा मंडळांना पोलीस अधिकारी स्वतः भेटी देऊन कौतुक करतील असेही सांगितले. या प्रसंगी सासवडचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गोपनीय विभागाचे भगीरथ घुले तसेच सासवड आणि तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनीही गणेश मंडळांना शांततेत गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. जी गणेश मंडळे आर्थिक दृष्ट्‌या सक्षम असतील आणि इतर मंडळांनीही या वर्षीपासून आपल्या गणेश मूर्तीसमोर आणि संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. जेणेकरून कोणी काही खोड करण्याचा अथवा काही गुन्हे करण्याचा प्रयत्न केल्यास अशी व्यक्ती शोधणे पोलिसांना आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सहज शक्‍य होईल.
दरम्यान यावेळी भिवरी येथील गणेश मंडळांनी गावच्या लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी भिवरी गावचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सासवड येथील अजय गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यालयांमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धन याबाबत स्पर्धा घेण्यात येईल. तसेच स्त्री भ्रूण हत्या देखावा, शेतकरी आत्महत्या, बचत गटाच्या सामाजिक कार्याबाबत स्पर्धा घेण्यात येईल, असे अनेक मंडळांनी सांगितले. यावर पोलीस अधिकारी अशोक भरते आणि क्रांतीकुमार पाटील यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. बोपगावचे पोलीस पाटील विनायक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)