मंडलिकवस्ती शाळेवर विज बिलाचा ‘डाग’

विजबिल थकविले : विद्यूत पुरवठा खंडीत होण्याची शक्‍यता
बाळासाहेब कवळे
कुरवली – प्राथमिक शाळा मंडलिकवस्तीमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग सुरू असून 102 विद्यार्थी शिक्षण घेत असून या अदर्श शाळेचा पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनीही आदर्श घेतला असून शाळेची आणि कामकाजाची पाहणीकरण्यासाठी अनेक शाळांनी भेटीही दिली आहेत. मात्र, ही आदर्श शाळेचे वीज बील थकल्याने शाळेचा विद्यूत पुरवठा कधीही खंडीत होवू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने या आदर्श शाळेवर याचा डाग पडण्याची चिन्हे गडद झाल्याने जिल्हा परिषदेने त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी जोर धरीत आहे.

शाळा व्यवस्थापनच्या माध्यमातून याठिकाणी पूर्व प्राथमिकचा छोटा गट व मोठा गट देखील सुरू आहे. परिसरातील आदर्शवत शाळा असल्यामुळे या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात असल्यामुळे पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेऐवजी जिल्हा परिषद मराठी माध्यमात मुलांचा प्रवेश घेतला आहे. शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्‍न दररोज सराव, स्पेलिंग पाठांतर, एबील अध्ययन, ई-लर्निंग, विविध स्पर्धाचे आयोजन, तरंग वाचनालय, वाचनकट्टा, शब्दांची रेल्वे, शब्द डोंगर, विविधसह शालेय स्पर्धेचे उपक्रम व नियोजन, संगणकाच्या माध्यमातून अध्यापन व संगणक शिक्षण, इंग्रजी अध्ययन समृद्धी आदी माध्यमातून शिक्षण देण्यासोबतच शाळेत ई-लर्निंग संच, संगणक, पाणी फिल्टर, शौचालय, सभागृह आदी भौतिक सुविधा असल्यामुळे पालकांना व विद्यार्थीना या शाळेचा लळा लागला आहे.

या शाळेला पुणे जिल्हा परिषदने 2017 -18 चा अध्यक्ष चषक देउन गौरवण्यात आले आहे, अशा या आदर्श शाळेची इंदापूर, बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तसेच सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील शाळांनी या ठिकाणी भेट देऊन अध्ययन पद्धत व कामकाज पहाणी केली आहे.

दरम्यान, महावितरण ने शाळाना दिलेल्या वीज जोडणीची बिल आकारणी व्यावसायिक दराने केल्यामुळे वाढीव बील येत आहेत. ही आकारणी घरगुती दराने केली जावी. अन्यथा वीज बिले थकीत असल्यामुळे भविष्यात शाळेचा वीजपुरवठा खंडीत केला जाईल. त्यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. घरगुती दराने वीज बिल आकारणी बाबतचा संबंधित प्रश्‍न शासनस्तरावर प्रलंबित असून लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्‍त केली.

पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू
सध्या या शाळेत पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी तावशी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा सुरू असून वीज बिलाची रक्कम थकीत असल्यामुळे अडचण येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मंडलकवस्ती : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)