संग्रहित छायाचित्र

शुक्रवारपासून झडती : जिल्हा प्रशासन करणार कारवाई

पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर महापालिका तसेच पोलिसांची परवानगी न घेता अनधिकृतपणे मंडप उभारणाऱ्या मंडळांची जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यासाठी शहरात चार पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका यांचे अधिकारी असणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून ही तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी महापालिकेकडून रस्त्यांवर उत्सवासाठी व अन्य व्यवसायांसाठी मंडप उभारण्यांवर कारवाईच्या नोटीस बजाविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तसेच त्यानुसार, कार्यवाही सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार, ही कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत करायची आहे. यासाठी बुधवारी हवेली तहसील कार्यालयात महापालिका, पोलीस यांची संयुक्‍त बैठक झाली. त्यात अनधिकृत मंडपांवर कारवाईसाठी एक मुख्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मंडल अधिकारी. उपायुक्त दर्जाचे पोलीस व महापालिका अधिकारी यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त शहराच्या पातळीवर चार पथके तयार करण्यात आली असून तलाठी, वॉर्ड अधिकारी. पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सवाच्या सहा दिवसआधीच तपासणी बंधनकारक आहे. त्यानुसारतपासणीत दोषी आढळून येणाऱ्या अनधिकृत मंडपांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)