मंडईमधील ड्रेनेजचे काम कधी पुर्ण होणार?

विक्रेत्यांचा सवाल : पावसाच्या पाण्यामुळे तारांबळ

पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री मंडईतील दुसऱ्या बाजूचे ड्रेनेजचे काम रखडल्याने पावसाचे पाणी तुंबून विक्रेत्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. ड्रेनेजचे काम कधी पुर्ण होणार, असा सवाल विक्रेते करत आहेत.

-Ads-

शहरातील मुख्य भाजी मंडई असलेल्या पिंपरीतील मंडईत दररोज लाखोंची उलाढाल होते. अनेक नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाजारात येतात. मंडईतील ड्रेनेज व्यवस्था जुनाट आहे. घुशींनी ती फोडल्यामुळे वारंवार ब्लॉक होते. त्यामुळे पावसाळ्यात मंडईत पाणी शिरते. मंडईला तलावाचे स्वरुप येते. विक्रेत्यांबरोबरच भाजी खरेदीसाठी येणारे ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत दैनिक “प्रभात’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करत या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिकेने ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंडईतील एका बाजुचे काम पुर्ण केले. त्यामुळे मंडईच्या अर्ध्या भागातील पाणी तुंबण्याचा त्रास कमी झाला आहे.

तथापि, मंडईच्या दुसऱ्या भागातील ड्रेनेजचे काम महापालिकेने केले नाही. त्यामुळे त्या भागात पाणी तुंबत आहे. मंडईत दररोज मोठ्या प्रमाणावर टेम्पो, ट्रक दाखल होतात. मंडईच्या दुसऱ्या बाजूला असलेले ड्रेनेज तुंबलेले असल्यामुळे माल उतरवताना मजुरांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते आहे. डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मजुरांसह, भाजी विक्रेते, ग्राहकांच्याही आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेली आठवडाभर पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वांचेच अतोनात हाल होत आहेत. मंडईच्या दुसऱ्या बाजूकडील ड्रेनेजचे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी धनंजय कांबळे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)