मंजुला माथुर यांच्याकडून ‘बर्ड्स अबोड’ हे कॉफी टेबल बुक राज्यपालांना भेट

मुंबई : निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकार आणि भारतीय संरक्षण लेखा सेवेतील निवृत्त अधिकारी मंजुला माथुर यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना ‘बर्ड्स अबोड’ हे कॉफी टेबल बुक भेट दिले.

यावेळी मंजुला माथुर यांचे पती आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर हेदेखील उपस्थित होते. ‘बर्ड्स अबोड’ हे पुस्तक म्हणजे मंजुला माथुर यांनी काढलेल्या भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या छायाचित्रांचे संकलन आहे.

आपल्या सेवाकाळात पक्षांचा अधिवास असलेल्या देशातील विविध ठिकाणांना भेट देऊन मंजुला माथुर यांनी माळरानातील पक्षी, वाळवंटातील पक्षी, जंगलातील पक्षी, शिकारी पक्षी, जलपक्षी, आर्द्रभूमीतील पक्षी यांसह अनेक पक्षांचे छायाचित्रण केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)