मंचर येथे श्रीराम नवमी उत्सव

मंचर-मंचर (ता. आंबेगाव) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त रविवारी (दि. 25) रामायणाचार्य माधव महाराज रसाळ यांचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती भाविक कांताशेठ बाणखेले आणि सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. अखंड हरीनाम सप्ताह कार्यकाळामध्ये थोर कीर्तनकार हभप प्रांजलताई सोमवंशी (बाल कीर्तनकार), सुदाम महाराज पानेगांवकर (नाशिक), संग्राम महाराज भंडारे (नाशिक), अंबादास महाराज बुरुडे (पनवेल), लक्ष्मण महाराज पाटील (आळंदी), पारस महाराज मुथ्था (नगर), किरण महाराज भागवत (शिरूर) तसेच रविवार हभप रामायणाचार्य माधव महाराज रसाळ(लासुर्णे) यांचे सकाळी 9 ते 11 श्रीराम जन्माचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती सुहास बाणखेले, सुरेश क्षिरसागर यांनी दिली. श्रीराम देव जन्मानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन प्रकाश काजळे, दत्ता सोमवंशी, बंडु सोमवंशी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)