मंचर येथे रविवारी पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा

मंचर -मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ, मुळशी तालुक्‍यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा रविवारी (दि. 1) होणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे-पाटील यांनी दिली.
पत्रकार कार्यशाळा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भाजप तालुकाध्यक्ष संजय थोरात, भाजप शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, विश्वस्त मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक, कोषाध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, उपाध्यक्ष एम. जी. शेलार, कार्याध्यक्ष सुनील लोणकर, कोषाध्यक्ष गणेश सातव, सरचिटणीस दत्ता म्हसकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तालुका पत्रकार संघाचे सचिव कांताराम भवारी यांनी दिली.
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कोरे, रामनाथ मेहेर, कुमार होनराव, नितीन बारवकर, सुरेश साखवळकर, मंचर उपजिल्हा रुग्णालय, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जीवन मंगल कार्यालय मंचर येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेला पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष अशोक शेंगाळे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)