मंचर येथे यात्रा कार्यालय

मंचर-मंचर येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कार्यालयाचे उद्‌घाटन सरपंच दत्ता गांजाळे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचर येथील शिवाजी चौकात निघोटवाडी, शेवाळवाडी आणि मंचर गावाचे एकत्रित यात्रा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तेथे भाविक स्वतःहून आपली यात्रेची बिदागी आणून देत आहेत. यात्रा कार्यालय उद्‌घाटनप्रसंगी साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, धर्मवीर पतसंस्थेचे संचालक मंगेश बाणखेले, मंचर शहर शांतता समितीचे उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे, स्वप्नील बेंडे पाटील, लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे तज्ञ संचालक जे. के. थोरात, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक संजय बाणखेले, सुरेश (अण्णा) निघोट, माजी सरपंच लक्ष्मण गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत शरद बॅंकेचे संचालक दत्ता थोरात यांनी केले. प्रास्ताविक मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, तर पंचायत समिती सदस्य राजाभाऊ बाणखेले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)