मंचर येथे मुक्त विद्यापीठ पूर्व तयारी प्रवेश प्रक्रिया सुरू

मंचर- मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी दिली. बौद्धिक पात्रता असूनही परिस्थितीमुळे पदवीचे स्वप्न अपूर्ण असणारे 4 थी ते 10 वी पास-नापास किंवा 12 वी नापास असणाऱ्या व्यक्तींना कायद्याने स्थापन झालेल्या आणि मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेता येते. पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना याच विद्यापीठात पदवीच्या पहिल्या वर्षास प्रवेश मिळेल. पूर्वतयारी वर्गाची प्रवेश प्रक्रिया बुधवार (दि. 30) पर्यंत चालू आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)