मंचर येथे जीपची चोरी

मंचर- मंचर येथील समर्थ कॉम्लेक्‍सच्या पार्किंगमध्ये रात्री उभी केलेली बोलेरो जीप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. बोलेरो चालक नवनाथ भगवान वायाळ (रा. मंचर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरात समर्थ कॉम्प्लेक्‍स ही इमारत आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये बुधवारी (दिण 24) रात्री साडेआठ वाजता नवनाथ भगवान वायाळ यांनी त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी (क्र. एमएच 14 ईएच 9592) ही लॉक करून उभी केली होती. त्यानंतर ते घरी गेले. सकाळी दहा वाजता वायाळ पार्किंगमध्ये गाडी आणण्यास गेले, तेव्हा गाडी जागेवर नव्हती. यासंदर्भात नवनाथ भगवान वायाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)