मंचर येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मंचर – महाराणा प्रताप संस्थेच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथे 20 वर्षाखालील तरुणांच्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली. शनिवार दि. 2 आणि रविवार दि.3 रोजी या स्पर्धा होणार आहेत. कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आणि सरपंच दत्ता गांजाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय थोरात आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकास चषक आणि 21 हजार, 15 हजार, 11 हजार,चतुर्थ क्रमांक 11 हजार आणि उपांत्य फेरीतील संघाला प्रत्येकी 2 हजार देण्यात येणार आहे. यावेळी उपकार्यकारी अधिकारी कोल्हापूर राजेंद्र भालेराव, अध्यक्ष आंबेगाव तालुका कबड्डी असोसिएशन बाळासाहेब पोखरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नवी मुंबई पांडुरंग निघोट, महाराष्ट्र किशोर गट कबड्डी संघ व्यवस्थापक संभाजी काळे,तहसीलदार राजगुरुनगर राजेश कानसकर, महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल प्रथमेश निघोट यांचा सत्कार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती पुरस्कार विजेते शरद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराणा क्रीडा मंडळाचे संस्थापक बाळासाहेब खानदेशी आणि अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)