मंचर येथे आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात

300 रुपये ते 800 रुपये डझन दराने विक्री

मंचर – मंचर येथे आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन बाजारभाव ग्राहकांच्या आवाक्‍यात आले आहे. चांगल्या प्रतिचा आंबा सरासरी 300 रुपये ते 800 रुपये डझन भावाने विकला जात आहे. चांगल्या गुणवत्तेच्या आंब्यांना ग्राहकाकडून मागणी असल्याचे व्यापारी सतिश बेंडे पाटील यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्‍यातील अनेक आंबा खरेदीदार वाशी मार्केट येथे दलाल म्हणुन काम करतात. कोकणात जाऊन फेब्रुवारी-मार्च महिन्यात आंबा बागायतदारांची भेट घेऊन आंबा खरेदी केला जातो. तिथून आंबा वाशी मार्केटमध्ये साठवला जातो. तेथून मंचर येथे आंबा विक्रीसाठी आणला जातो. मंचर येथील प्रसिद्ध आंबा विक्रेते मल्हारराव बाबुराव आणि कंपनीकडे मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होते. आंब्याची गुणवत्ता म्हणजे कारपेट विरहीत आंबा तयार होतो. त्यामुळे येथील आंब्याला नैसर्गिक चव असल्याने ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे आंबा व्यापारी सतिश बेंडे पाटील यांनी सांगितले.

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयानजीक अभिनव आंबा विक्री केंद्र सुरू असून मार्च ते जूनपर्यंत आंबा विक्री केली जाते, अशी माहिती सुनील पोखरकर यांनी दिली. येथे आंबा खरेदीसाठी नाशिक, संगमनेर, शिरूर, मुरबाड, पारनेर, खेड, जुन्नर तालुक्‍यातील ग्राहक येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी आंब्याचा विक्रीचा बाजारभाव 700 ते 2 हजार रुपये डझन होता. तेच बाजाभाव सद्यस्थितीत ग्राहकांच्या आवाक्‍यात आल्याने आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याची माहिती लक्ष्मण पारधी यांनी दिली.

कोकणात एक महिन्यापूर्वी वादळी पावसाने आंबा उत्पादनाचे मोठे नुकसान झाले होते. वातावरणातील उष्णतेमुळे आंब्याचे मुबलक पीक आले नाही, अशी माहिती तुषार देशमुख यांनी दिली. तूर्त आंब्याच्या दरामध्ये फारशी वाढ झाली नाही. भाव आवाक्‍यात आल्याने सद्यस्थितीत आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याची माहिती सतिश बेंडे पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)