मंचर-मुंबई बसचे भाडे 500 रुपये

मंचर- एसटी बसला मंचर-मुंबई प्रवासासाठी 250 रुपये प्रवाशांकडून तिकीट आकारले जाते;परंतु ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी वाहनचालक मंचर-मुंबई प्रति प्रवासी 500 रुपये भाडे आकारत आहे, त्यामुळे अनेक प्रवाशांची लूट होत असून, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी वारंवार करत असताना एसटीचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत.
आंबेगाव तालुक्‍यातील अनेक गावांतील ग्रामस्थ मुंबईला नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.नोकरदार आणि व्यावसायिक दिवाळी सणानिमित्त गावाकडे येतात. दिवाळी संपली असून अनेक चाकरमानी आणि उद्योजक आता आपापल्या कामावर परतण्यासाठी मंचर-मुंबई प्रवास करीत आहेत; परंतु हा प्रवास करत असताना एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे मंचर-मुंबई हा प्रवास करताना गर्दीचा सामना, तर करावा लागतोच आहे आणि खासगी वाहनांना पसंती दिली तर दुप्पट भाडे द्यावे लागत आहे.
या खाजगी वाहन चालकांकडून अडीचशे ते तीनशे रुपये भाडे असणाऱ्या मंचर-मुंबई प्रवासाला पाचशे रुपये आकारले जात असल्याने प्रवाशांची लूट होत आहे. याकडे एसटी प्रशासनाचे आणि पोलिसांचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आपापल्या उद्योग-व्यवसायासाठी मुंबईला परत जाण्यासाठी अपुऱ्या एसटी बस व्यवस्थेमुळे प्रवाशांना सध्या जादा भाडे देऊन खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत गावी आलेल्या लोकांसाठी जादा एसटी बसेस एसटी महामंडळाने सोडाव्यात, अशी मागणी मंचर बस स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)