मंचर-भीमाशंकर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

भीमाशंकर- मंचर-भीमाशंकर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या दुतर्फा वाढलेल्या झाडा-झुडपामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
भीमाशंकर हे तीर्थ क्षेत्र असून देशातील बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असून हे सह्याद्रिच्या रांगामध्ये वसले आहे. या ठिकाणी अभयअरण्य असल्यामुळे देशाच्या कानोकोपऱ्यातुन मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक येत असतात. मंचर-भीमाशंकर रस्ता खड्डेमय झाला असून काही ठिकाणी तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
खड्डे चुकवताना वाहनांचे व दुचाकींचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डयांमुळे गेल्या दोन-तीन महिण्यांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून यामध्ये काही निरपराध नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तसचे अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पर्यटक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
संबंधित ठेकेदाराला दिल्या सूचना
याबाबत घोडेगावचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबधित ठेकेदाराला खड्डे बुझविण्यास सांगितले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस येत असल्यामुळे कामात व्यत्यय आला आहे. डांबराने खड्डे बुझविण्याचे काम दोन दिवसात सुरू करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)