मंचर बाजार समितीमागे सदनिका धारकांचे अतिक्रमण

मंचर- मंचर शहराच्या बाजार समितीच्या मागील बाजूस सदनिका धारकांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्ते लहान झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अक्षरशः पाण्याच्या डबक्‍यातून बाहेर जाण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पालक उचलून नेत आहे.
मंचर प्रांत कार्यालयापासून डोबी मळ्याकडे, तसेच अनेक सदनिकांना जाण्यासाठी रस्ता आहे. अनेक सदनिकाधारकांनी अतिक्रमण करून रस्ते लहान केले आहेत, तसेच रस्त्यावर साठणारे पाणी आपल्या सदनिकेकडे येऊ नये यासाठी सिमेंट बांध टाकले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी वाहीन जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचून राहत आहे. मिलिनियम, शिवशंभो थोरात चाळ, पोखरकर चाळ येथील सदनिकाधारक साठलेल्या पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत. मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने येथील समस्यांबाबत लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सरपंच प्रमिला निऱ्हाळी यांच्यासह येथील सदनिकाधारकांनी केला आहे, तसेच येथील सदनिकाधारक घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरूनही कोणतीही सुविधा मिळत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)