मंचर बाजारपेठेत रोडरोमिओंचा उच्छाद

व्यापाऱ्यांनी केली कारवाई करण्याची मागणी

मंचर: मंचर शहरातील बाजारपेठांमध्ये रोडरोमिओ घिरट्या घालत आहेत. रोडरोमिओ व टवाळगिरी करणाऱ्या पोरांचा त्रास महाविद्यालयीन मुली, दुकानदारांना सहन करावा लागत आहे. मंचर पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंचर बसस्थानक, लक्ष्मी रोड व तुळशीबाग हा रस्ता आता रोडरोमिओ करणाऱ्या मुलांचा केंद्रबिंदू बनला आहे. या रस्त्यावर मंचरची मुख्य बाजारपेठ मानली जाते. या रस्त्यावरुनच महाविद्यालयीन विद्यार्थिनी ये-जा करतात. त्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी रोडरोमिओ, टारगट मुले सुसाट वेगात गाड्या चालवतात.

येथील असलेल्या सर्वच बाजारपेठेवर याचा परिणाम जाणवत आहे. एकाच मोटार सायकलवर तीन ते चार जण बसून सुसाट वेगाने गर्दीत मोटारसायकल चालवितात. तसेच मोटारसायकलवर रोडरोमिओ महाविद्यालय भरताना व संध्याकाळी सुटल्यानंतर दिवसभरातून 7 ते 8 वेळा या रस्त्यावरुन काम नसताना देखील चक्रा मारीत असतात.

या दहशतीमुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लहान मुले, वृद्ध, महिला व नागरिक जिवाच्या भीतीपोटी ये-जा करण्यास घाबरत आहेत. रोडरोमिओ व टवाळगिरी करणाऱ्या मुलांमुळे येथील बाजारपेठ व धंद्यावर मोठया प्रमाणावर परिणाम जाणवत आहे. येथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाल्याने ग्राहक येण्यास घाबरत आहेत. मंचर पोलिसांनी या रस्त्यावरुन वेगाने मोटासायकल चालविणाऱ्या रोडरोमिओवर कारवाई करण्याची मागणी दुकादारांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)