मंचर, घोडेगावच्या ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा शॉक

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील मंचर, घोडेगाव परिसरातील स्थानिक वीज मंडळ कार्यालयात वीज बील दुरूस्तीसाठी ग्राहकांना अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. मुदत संपल्यावर ग्राहकांना वीज बील मिळत आहे. त्यामुळे विनाकारण दंड भरावा लागत आहे. महावितरणने मीटरवरील बील अचुक घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत वीजग्राहक हक्क बचाव समितीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रविण मोरडे म्हणाले की, दर महिन्याला घरगुती बील ग्राहकांना वीज बील दिले जाते. काही ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंगचे फोटो घेऊन बील दिले जाते. ते बील अचूक असून ग्राहकांची त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. बील अचुक घेण्यासाठी वीज मंडळाने ठेकेदार नेमले आहेत. त्यांना मीटरमागे ठराविक रक्कम दिली जाते. एवढे करुनही अनेक ग्राहकांना वीज बिलावर मीटर रिडींगचे फोटो येत नाहीत. ज्यादा वीजबील दिल्याने ग्राहकांना वीज बील दुरूस्तीसाठी वीज मंडळाच्या कार्यालयात अनेक चक्करा माराव्या लागत आहेत.
मिटर रिंडींग वेळेवर घेतले जात नसल्याने वीज वापर वाढला तर त्या ग्राहकांना ज्यादा दराने वीज बील येत आहे. पर्यायाने ग्राहकांचा काही दोष नसताना विनाकारण ज्यादा बिलाचा दंड भरावा लागत आहे. याबाबत मंचर वीज मंडळ आणि घोडेगांव वीज मंडळ कार्यालयाने वीज मीटर रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करुन ग्राहकांना न्याय द्यावा, अन्यथा वीज बिलाची होळी, मंचर व घोडेगाव कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा ही मोरडे यांनी दिला. वीज बील भरण्याची मुदत संपल्यावर ग्राहकांना वीज बील मिळते. त्यामुळे विनाकारण ग्राहकांना दंड भरावा लागत असल्याच्या बाबींकडे ही मोरडे यांनी लक्ष वेधले आहे.
रिडींग प्रमाणे बील देण्यास बांधील
याबाबत मंचर वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता संतोष तळपे म्हणाले की, वीज ग्राहकांना मीटर रिडींग प्रमाणे वीज बील देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. जर कोणाची वीजबिला संदर्भात तक्रार असेल तर ती तपासून योग्य तो न्याय दिला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)