मंचर गळक्‍या शाळेत विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे

मंचर- मंचर जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची इमारत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची असून, या शाळेला सात वर्ग आहेत. शाळा इमारतीचे काही ठिकाणी दगड निखळलेले आहेत, तसेच छताची शेकडो कौले फुटली आहेत. सद्यःस्थितीत सर्व वर्गांमध्ये छतामधून पावसाचे पाणी गळत असून, अशा गळक्‍या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मंचर शहराच्या भरवस्तीत असणारी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. छताची अनेक कौले फुटल्याने विद्यार्थ्याना अंगावर पाणी घेऊनच शिक्षण घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. याबरोबरच शाळा क्रमांक 3 ची इमारतीचेही दुरूस्ती करणे गरजेचे आहे. वऱ्हांड्यात सर्वत्र चिखल झाला असून, अक्षरशः लहान विद्यार्थ्यांना उचलुन घेऊन वर्गात न्यावे लागते. शाळा वऱ्हांड्यात मुरूम टाकून व्यवस्थित मैदान तयार करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळा इमारत पाडण्यासाठी दीड वर्ष जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करूनही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • शाळा क्र. 1 मधील विद्यार्थी किंवा शिक्षकांना दररोज सकाळी वर्गात साचलेले पावसाचे पाणी पुसून काढावे लागत आहे. पावसाचे पाणी भिंतीत जिरत असून त्यामुळे इमारतीला धोका होण्याची भीती आहे. धोकादायक इमारत, गळक्‍या खोल्यात विद्यार्थी शिक्षण घेतात, तर शिक्षक ज्ञानार्जन करतात. ही बाब जीवावर बेतणारी आहे. जिल्हा परिषद शाळा धोकादायक असून इमारत पाडण्यासाठी दीड वर्ष पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद मिळत नाही.
    – वसंतराव बाणखेले (अध्यक्ष), संतोष बाणखेले, मराठी शाळा क्रमांक 1 चे शाळा व्यवस्थापन समिती
  • पोषण आहार खोलीची स्थितीही दयनीय
    पोषण आहार तयार करण्यासाठी दिलेली खोली पूर्णतः गळतआहे. त्यामुळे छतातून पडणारे पाणी फरशीवर इतरत्र जाऊ नये, म्हणुन ठिकठिकाणी बादल्या आणि टब ठेवले आहेत. पोषण आहार असल्यामुळे तेथे उंदराचे मोठे साम्राज्य आहे.त्यांच्या बिळांमुळे या इमारतीच्या भिंती भुसभुशीत झाल्या आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)