मंचरला 45 रोडरोमिओवर कारवाई

मंचर- मंचर शहर परिसरात सुमारे 45 रोडरोमिओ आणि 10 दुचाकीस्वारांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. रोडरोमिओ आणि परवाना नसणाऱ्या वाहनचालकांवर यापुढे ही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली.
गेल्या 15 दिवसांपासून मंचर पोलिसांनी बेशिस्त वागणाऱ्या तरुणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, जुना महाविद्यालय रस्ता, संभाजी चौक मंचर बसस्थानक परिसर येथे पोलिसांनी कारवाई केली. मंचर दामिनी पथक व खेड निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी 45 रोडरोमिओ, फॅन्सी नंबर प्लेट, टीपल सीटच्या दहा केसेस दाखल केल्या आहेत. या कारवाईमध्ये मंचर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस व्ही. आर. कोणकरी, एन. वी. वारे, पोलीस कर्मचारी आर. व्ही. बनकर, डी. एस. जाधव, एच. ए. शिंदे, एस. एस. माताडे, निर्भया पथकाचे महिला पोलीस एस. पी. बनकर, पी. एच. मराडे आदी सहभागी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)