मंचर- मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द येथे राजरोसपणे गुटखा विक्री केला जात असल्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या अधीन गेल्याचे दिसून येत आहे. शाळा आणि कॉलेज परिसरात गुटखा विक्रीला बंदी असली तरीही पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे सर्रास सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री चालू असून अवैध गुटखा विक्रेते पोलिसांना हाताशी धरुन आपला व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत. काही ठिकाणी छुप्प्या पद्धतीने तर काही ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. चाकण, खेड व अन्य ठिकाणी गुटखा विक्रेत्यांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय परिसरातील टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याने युवा पिढी व्यसनाच्या अधीन गेल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)