मंचरला अंधश्रद्धा निर्मुलन विषयावर मार्गदर्शन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
यावेळी विज्ञान बोध वाहिनीचे व्यवस्थापक भास्कर सदाकळे, अंनिसचे जिल्हा सचिव मनोहर शेवकरी, महिला संघटक साधना बाजारे, प्राचार्य उत्तम आवारी, उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे, पर्यवेक्षक यादव चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. भास्कर सदाकळे यांनी जादू-टोणा, करणी, भूत-बाधा, अनिष्ट व अघोरी प्रथा, समाजातील भोंदू बाबांची वाईट कृत्ये प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांसमोर मांडली व विज्ञानाची कास धरण्याचा सल्ला दिला. साधना बाजारे यांनी “शूर गडी तू वीर गडी तू’ हे गीत सादर केले. यावेळी दिलीप चौधरी, दत्तात्रय चासकर, दिलीप कुंभार, अशरफखान पठाण, सुवर्णा गोसावी, लता गेंगजे, राजू हुले, किशोर जगताप, बाळकृष्ण केदारी, सत्यवान तोत्रे, निर्मला बाणखेले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले. सूत्रसंचालन केशव टेमकर यांनी तर माधव कानडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)