मंचरमध्ये “सांज दीपावली’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

मंचर- मंचरमधील क्रीडा संकुल येथे जिव्हाळा परिवार आयोजित रजनी प्रकाश फाउंडेशन आणि गोवर्धन प्रस्तुत सांज दीपावली कार्यक्रम पार पडला. पोवाडा, लावणी या गीतांना प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून प्रचंड प्रतिसाद दिला.”जिव्हाळा’ या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, प्रीतम शहा, नेत्रा शहा, प्रीती शहा, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे,उद्योजक अजय घुले, सुषमा शिंदे, पूर्वा वळसे पाटील, ऍड. बाळासाहेब पोखरकर, अभियंता बाळासाहेब पोखरकर, डॉ.ओंकार काजळे, ऍड. राहुल पडवळ आदींसह परिसरातील रसिक उपस्थित होते. यावेळी कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील “सूर निरागस हो…’ या गीताने कार्यक्रामाची सुरुवात झाली. “सैराट’मधील “याड लागलं…,जीवलगा कधी रे येशील तू…, लख्ख पडला प्रकाश दिवट्‌या मशालीचा…, आश्‍विनी ये ना… आदी गाण्यांबरोबरच गवळण, पोवाडा, लावणी… अशा मराठी आणि हिंदी गाण्यांनी मंचरकरांची मने जिंकली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)