मंचरमध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळावा

संग्रहित छायाचित्र

मंचर – मंचर येथील लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेडच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे शुक्रवारी (दि. 23) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अरुण महादेव लोंढे यांनी दिली. महात्मा गांधी सभागृह ग्रामपंचायत, मंचर येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव, राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सतीश मोरे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी सरपंच दत्ता गांजाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विभागीय अधिकारी डी. बी. चौरे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी सभासदांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मंचर विविध कार्यकारी सोसायटी सहकारी लिमिटेडच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)