मंचरमध्ये महिलांची शोभा यात्रा

मंचर- शहरात विविध नवरात्र मंडळांनी पारंपारिक वाद्यात देवीची मिरवणूक काढून देवीची स्थापना केली. यात कलशधारी महिलांची शोभा यात्रा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच बॅंड, लेझीम आणि ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. मंचर शहरात एस कॉर्नर येथील नवरात्र उत्सव मंडळ, मुळेवाडी येथील गवळीबाबा, वजीर, बाजारपेठेतील सप्तरंग आणि सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या. शिवगिरी मंगल कार्यालयाच्या परिसरात मंचर उत्सव प्रतिष्ठान नवरात्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, कार्याध्यक्ष दत्ता थोरात आहेत. येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. रासदांडिया कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक युवक, युवती आणि महिलांना लकीड्रॉ पद्धतीने आकर्षक भेट दिली जाणार आहे. रविवारी (दि. 14) सायंकाळी सात वाजता पाककला स्पर्धा होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते सतिष बेंडे यांनी दिली. मंडळाचे कार्यकर्ते प्रवीण मोरडे, शेखर चौधरी, सुनिल पोखरकर, अक्षय बेंडे, सागर बेंडे, राहुल वाबळे, सचिन मोरडे, विशाल मोरडे, अवधुत शेटे, निलेश बाणखेले, ज्ञानेश्‍वर शेटे आदी कार्यकर्ते नवरात्र उत्सव यशस्वीपणे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)