मंचरमध्ये जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

मंचर- भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव जैन संघ मंचरच्या वतीने गुरुवारी (दि. 29) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “जय बोलो महावीर की…, जोरसे बोलो जय महावीर, महावीर स्वामी भगवान की जय’ अशा विविध घोषणा युवकांच्या वतीने देण्यात आल्या. जैन धर्माचे 24 वे तिर्थकार महावीर स्वामी भगवान यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी महावीरांची प्रतिमेची मिरवणूक फुलांनी सजविलेल्या पालखीतून काढण्यात आली. अग्रभागी सुमधूर ब्रॅन्ड वृंद होते. मिरवणुकीमध्ये युवकांचा व महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.मिरवणुकीची सर्व व्यवस्था संघपती कुमारपालजी समदडीया, गोवर्धन समुहाचे देवेंद्र शहा, रतनलाल भंडारी यांनी पाहिली. प्रकाश लोढा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सुमतीनाथ भगवान मंदिरामध्ये सर्व जैन बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रम ठेवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)