मंचरमध्ये उद्या मधुमेह प्रतिबंधावर व्याख्यान

मंचर- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मंचर येथे विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावर शनिवारी (दि. 12) व्याख्यान होणार आहे. डॉ. जगन्नाथ दिक्षित मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे उपाध्यक्ष राम गावडे व संचालक सागर काजळे यांनी दिली. मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत हे व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. संतोष ढुमणे, डॉ. वेदा नलावडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)