मंचरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मंचर- मंचर येथील शंकराच्या मंदिराजवळ 40 ते 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पाटीलवाडी मंचर येथील सदानंद हरिदास थोरात यांच्या शेतातील शंकराच्या मंदिराजवळ एक महिला बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्यानंतर संबंधित महिलेस मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास मंचर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)