मंचर- राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुडकर यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाला आहे. त्यामुळे मंचर येथील नळपाणीपुरवठा योजना कामाचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. मंचर शहर नळपाणीपुरवठा योजना कामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि.1) होणार होता. त्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने गुरूवारी (दि.31) आकस्मिक निधन झाले. त्यामुळे शासकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 1 जून) आयोजित मंचर शहर नळपाणीपुरवठा योजना कामाचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मंचर शहर नळपाणी पुरवठा योजना शुभारंभ कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच निश्‍चित करून ग्रामस्थांना करून कळविण्यात येईल, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)