मंचरमधील जलतरण तलाव बंद

मंचर-मंचर शहरातील दुरूस्तीअभावी जलतरण तलाव बंद आहे. तातडीने जलतरण तलावाची दुरूस्ती करून नागरिकांना पोहण्यासाठी खुला करावा, अशी मागणी मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंतराव बाणखेले यांनी केली आहे. जलतरण तलावाची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. सदर दुरूस्तीचे काम जवळजवळ वर्षभर सुरू आहे. क्रीडा संकुलामध्ये बॅडमिंटन हॉल असुन हॉलच्या काचांची मोडतोड झाली असुन तो हॉल पावसाळ्यात गळत आहे.बॅडमिंटन कोर्टवर एक साधे फाटलेले मॅट बसविले आहे.सदर बॅडमिंटन कोर्टमध्ये उडन मॅट न बसविल्यामुळे त्या ठिकाणी खेळणाऱ्या खेळाडुंना गुडघ्यांची इजा होण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे अनेक नागरिक त्या बॅडमिंटन हॉलकडे फिरकतदेखील नाही.सदर कोर्टवर उडन मॅट बसविण्यात यावी.बॅडमिंटन हॉलची साफसफाई वेळेवर होणे गरजेचे आहे. सदर बंद पडलेल्या जलतरण तलावाची व बॅडमिंटन हॉलची तातडीने दुरूस्ती करून जलतरण व बॅडमिंटन हॉल नागरिकांना पोहण्यासाठी व खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा.अशी मागणी मंचर ग्रामंपचायतीचे माजी सदस्य वसंतराव बाणखेले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.यासंदर्भातील निवेदन मंचर येथील प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)