मंचर-मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांचा गौरवपत्र देऊन पुणे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मंचर येथे सत्कार केला. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव यांच्यासह विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
सरपंच दत्ता गांजाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाने फ्लेक्‍सवर बंदी करण्याअगोदर मंचर शहरात फ्लेक्‍स बंदी करुन पर्यावरणाचे रक्षण केले. तसेच प्लॅस्टिक बंदी करुन प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम यावर शहरात जनजागृती केली. अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई करुन सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर शहराच्या स्वच्छतेबाबतचा नावलौकिक राज्यभर केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या हस्ते सरपंच दत्ता गांजाळे यांना गौरव पत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित क रण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, प्रदीप पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध संघटना, संस्थांनी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)