मंचरच्या गांधी विद्यालयास “कर्मवीर पारितोषिक’

मंचर- येथील महात्मा गांधी विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला “कर्मवीर पारितोषिक’ पुरस्काराने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, अशी माहिती प्राचार्य उत्तम आवारी यांनी दिली.
महाराष्ट्रातील अग्रणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सातारा येथे आयोजित भव्य वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व चषक महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, उपप्राचार्य माधव कानडे, पर्यवेक्षक पंढरीनाथ बारवे यांनी स्वीकारला. यावेळी लक्ष्मण रोडे, दिलीप चौधरी, दशरथ काळे, यादव चासकर, केशव टेमकर, लाजरस उपार आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमा महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या “गोविंदा फ्यूजन’ या आधुनिक लोकप्रिय नृत्याने श्रोत्यांची शाबासकी मिळवीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका स्वाती उपार यांना प्रशस्तीपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते व उपप्राचार्य माधव कानडे, पर्यवेक्षक व्ही. पी. पवार, रयत बॅंकेचे संचालक पंढरीनाथ बारवे, विलास बेंडे, विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थिती गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाल्यामुळे पंचक्रोशीतून विद्यालयाचे कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)