मंचर-मंचर ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातील फंडामधून मंचर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 मध्ये 100 टक्‍के स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहे. सुमारे 170 पथदिवे आणि 12 मीटरचे 2 हायमस्ट दिवे लावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात भक्‍ते पाटील यांनी दिली. मंचर येथील पिंपळगाव फाटा, चांडोली फाटा तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये सुमारे हायमस्ट दिवे उभे करून त्यावरती सीस्का एलईडी कंपनीचे दिवे बसविण्यात आले आहे. त्यामध्ये चाळीस बंगला, जुना चांडोली रोड, शेटे वस्ती, विकासवाडी, जाधवमळा, पोखरकर मळा, पिंपळगाव फाटा, भक्‍ते मळा, खानदेशेमळा, लोंढेमळा व इतर ठिकाणी मोठे एलईडी पथदिवे बसविण्यात आले. सीताराम लोंढे, अरूण लोंढे, बयाजी थोरात, अश्‍विनी शेटे, अंजना भवारी, सोपान थोरात, देविदास लोढें, गणेश खानदेशे, गोटू शेटे, रामचंद्र लोढे, कैलास लोंढे, अरूण गांजाळे, संदीप थोरात, राजेश थोरात आदींनी दिवे बसविण्याची केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)