मंचकरांना “बाहुबली’ने खदखदून हसवले

“चला हवा येऊ द्या’च्या टीमची तुफान कॉमेडी

मंचर- येथे “चला हवा येऊ द्या’च्या टीमने “बाहुबली’द्वारे तुफान कॉमेडी सादर करून मंचर (ता. आंबेगाव) येथील नागरिकांना पोटधरून हसलवले. तर सरप्राईज पॅकेज ठरला तो प्रसिद्ध अभिनेता गोविंदा. यावेळी गोविंदाने सादर केलेल्या नृत्याने आणि दादा कोंडके यांची केलेल्या नक्कलेने उपस्थितांचे मने जिंकली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त गोवर्धन उद्योग समुहाचे प्रमुख देवेंद्र शहा आणि प्रितम शहा यांच्या वतीने रामनगरी मैदानात गोवर्धन प्रकल्पाच्या वतीने आयोजित “उत्सव आनंदा’चा कार्यक्रमत अनेक दिगज्ज कलाकारांनी नृत्य, कॉमेडी, गाणे सादर करून उपस्थितांना मंत्रमुगध केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. बाजी व हिरा यांचे आगमन क्रेनद्वारे व्यासपीठावर झाले. तर विनोदी अभिनेता भाऊ कदम चक्क ट्रॅक्‍टरमधून प्रेषकांमधून पुढे आला. वैशाली बसने हिच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. तर राणा, अंजली, गुरूनाथ, शनाया, शितल, अजय यांनी एक पोरी नाक्‍यावरती, ही पोरी साजुक तुपातली, ओ काका आदी गाण्यावर नृत्य केले. शेतकरी मुलाचे लग्न परदेशी मुलीशी ठरते. नेदरलॅंड वरुन वडीलासंह आलेली मुलगी व मुलाचा परिवार यांच्यातील विनोद चला हवा येवु द्या च्या कार्यक्रमात दाखविण्यात आला. कुशल बद्रीके सासु तर मुलीच्या भिुमकेत श्रेया बुगडे यांनी छाप पाडली. सोनाली कुलकर्णी हिची धमाकेदार एन्ट्री व्यासपीठावर झाली. तिने नृत्य सादर केले. आनंद शिंदे व आदर्श शिदे यांच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. कलाकारांनी सादर केलेल्या डोळे बांधून जोडीदाराला शोधण्याचा गाण्याला प्रतिसाद मिळाला. मानसी नाईक हिने लावणी सादर केली.
चला हवा येवु द्याच्या टिमने बाहुबली सादर करून उपस्थितांना पोटधरून हसायला लावले. कुशल बद्रीकेचा कटप्पा, भाऊ कदम बाहुबली, श्रेया बुगडेचा देवसेना ही पात्रे प्रत्येक वाक्‍याला टाळ्या मिळवित होती. सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांनी दाद मिळवून गेले. दरम्यान, सात एकर क्षेत्रावर बैठक केली होती. नागरिक स्क्रिनवर कार्यक्रम पहात होते. अनेक कलाकारांचा सहभाग, भव्यदिव्यता आणि विनोदनृत्य गाणी यांची प्रेक्षकांपुढे हा कार्यक्रम यशस्वी झाला. देवेंद्र शहा परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते..

  • त्यावर विश्‍वासच बसेना
    सिनेअभिनेते गोविंदा यांच्या आगमन अनेकांना धक्का देणारे ठरले. निवेदक निलेश साबळे याने सरप्राईज आहे, असे सांगितले होते. मात्र, कोण येणार हे सांगिले नव्हते. त्याचवेळी व्यासपीठावर गोंविदा अवतरला व त्याने नृत्याला सुरुवात केली तरी नागरिकांना विश्‍वास बसेना अखेरा जेव्हा विश्‍वास बसला त्यावेळी उपास्थितांमधून शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, गोविंदाने वळसेपाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रसिद्ध अभिनेते स्व. दादा कोडके यांची नक्कल त्याने करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. त्याचबरोबर त्याला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि गोवर्धन उद्योग समुहाचे देवेंद्र शहा यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)