मंगळ मोहीम : क्युरिओसिटी यानाने पूर्ण केला मोठा टप्पा

न्यूयॉर्क : अमेरिकेची महत्त्वाकांक्षी असलेली मंगळ मोहीम यशस्वी ठरत आहे. मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी नासाने प्रेक्षापित केलेल्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या यानाने आपले मंगळ मोहिमेचे २ हजार दिवस पूर्ण केले आहेत. हे यान मंगळावर ऑगस्ट २०१२ मध्ये उतरले.

आतापर्यंत रोव्हरने यानंतर या यानाने मंगळावर गोड्या पाण्याचे अस्तित्व असलेले ठिकाण शोधले होते. तेथील खडकांचे नमुनेही यानाने गोळा केले आहेत. २०१४ पासून या यानाने मंगळ ग्रहावरील पर्वतावर चढणे सुरू केले.  तत्पूर्वी या पर्वताचे काही फोटोदेखील यानाने नासाकडे पाठवले होते. माऊंट शार्प असे या पर्वताचे नाव आहे. दरम्यान, या मोहिमेतून आणखी काय समोर येते. याची उत्सुकता खगोलप्रेमींना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले दिवंगत संशोधक शात्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांनी कोणत्याही प्रयोग शाळेचा आधार न घेता ह्या आधुनिक शास्त्रातील काही सिद्धांत मांडलेत व ते अधिकृत रित्या मान्य करण्यात आलेत नुकतेच त्यांनी १०० वर्षा नंतर मानवाला राहण्यासाठी दुसर्या ग्रहाचा शोध घेणे गरजेचे आहे ह्याची आगाऊ सूचना दिल्यानेच नासा दुसर्या ग्रहांच्या शोधात आहे ह्याची जगभर चारचा होताना दिसते आपल्या देशातील समस्त शास्त्रज्ञानी त्यांची वरील सूचना मान्य केली आहे त्यासाठी त्यांना एकाही व्यक्तीने हे कशाच्या भरोशावर व कशाच्या आधारावर असे प्रश्न विचारल्याचे ऐकिवात नाही किंवा त्यांना देवावर विश्वास ठेवणारे अंधश्र्द्धावादी म्हणून हिनवले नाही परंतु आपल्या संतशास्त्रज्ञानी म्हणजे द्यानेश्वरांनी कित्येक वर्ष अगोदरच मंगल ग्रहावर पाणी नसल्याचे सांगितले असताना व ते आजच्या आधुनिक शास्त्रानुसार सिद्ध होऊनही आपल्या देशातील किती शास्त्रज्ञानी ज्ञानेस्वरांचे भाकीत खरे ठरले आहे ह्याची कबुली दिली ? अथवा काबुल करण्याचे धाडस दाखविल्याचे पाहावयास मिळते ? १०० वर्षा नंतर ह्या पृथ्वीचा अंत कशाप्रकारे होणार आहे ह्या बाबत संत शात्रज्ञ रामदासस्वामी ह्यांनी कित्येक वर्ष खुलासेवार सांगितल्याचे पुण्यातील समस्त वृत्तपत्राना 24-01-२०१८ लेखी कळवूनही एकाही वृत्तपत्राने ह्याची दाखल घेऊ नये हे कशाचे द्योतक समजावे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)